Embelia ribes or Vavding

Vavding or Embelia ribes, commonly known as false black pepper, white-flowered embelia, viḍaṅga (Sanskrit: विडङ्ग), vaividang, vai vidang is a species in the family Primulaceae.

Dhananjay Patil

7/28/20241 min read

Vavding or Embelia ribes, commonly known as false black pepper, white-flowered embelia, viḍaṅga
Vavding or Embelia ribes, commonly known as false black pepper, white-flowered embelia, viḍaṅga

वावडिंग

भारतात ती हिमालयात, महाराष्ट्रातील डोंगराळ भागात, कोकणच्या दक्षिण भागात, तसेच तमिळनाडू, केरळ राज्यांतील डोंगराळ प्रदेशात दिसून येते.

वावडिंगाची वेल आवृतबीजी वनस्पती असून दुसऱ्या वनस्पतीला विळखे घालून वाढते. खोड सडपातळ, खरबरीत असून त्यावर लालसर ग्रंथी असतात. फांद्या लांब, बारीक लवचिक असून कांडे लांब असते. पाने साधी, एकाआड एक, दीर्घवर्तुळाकार, दोन्ही टोकांना टोकदार, चकचकीत आणि चामड्यासारखी असतात. फुलांचे तुरे असतात. फुले लहान, पांढरी असून त्यांचे देठ सेंमी. लांब असतात. फळे काळी मिरीपेक्षा लहान, लालसर तांबडी ते काळ्या रंगाची असून त्यावर उभे पट्टे असतात. ती गोलाकार, गुळगुळीत, मांसल असून पिकल्यावर काळी होतात. फळांमध्ये भुरकट लाल रंगाचा मगज असतो. वावडिंग मिऱ्यासारखी किंवा कबाबचिनीसारखी दिसतात. फळात बी एकच असते.

वावडिंग रुचकर, तिखट, उष्ण थोडेसे कडवट आणि तुरट असते. त्यात एंबेलिक आम्ल असते. आयुर्वेदानुसार वावडिंग पाचक, मूत्रल, उत्तम भूकवर्धक, वायुनाशी, कृमिनाशक, मेंदू चेतातंतूस शक्ती देणारे आहे.

औषधी उपयोग

) मनुष्याचे शरीरावर वावडिंग विलक्षण गुणकारी आहे. वावडिंग घेणाऱ्याला भूक लागते, अन्न पचते, शौचास साफ होते, वजन वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, शरीर तेजःपुंज दिसते मनास आल्हाद वाटतो.

) लहान मुलांच्या रोगांत तर हे दिव्य औषध आहे. मुले सुद्दढ राहण्यास अखंड वावडिंग दुधांत उकडतात ते दूध देतात.

) लहान मुलांना जंत झाले असता फळांचे चूर्ण मधातून देतात.

) आंकडी, फेफरें, अर्धांगवायु वगैरे मेंदू मज्जातंतूच्या रोगांत वावडिंग लसणाबरोबर दुधांत उकडून, ते दूध देतात.

) त्वचारोगांत वावडिंग पोटात देतात त्याचा लेप करतात. कधी धुरीहि देतात.

) तऱ्हेतऱ्हेचे कुष्ठरोग अन्न नीट पचन झाल्यामुळे उद्भवतात. वावडिंगाने पचनक्रिया सुधारल्यामुळे शौचास साफ झाल्यामुळे कुष्ठ बरे होतात आणि शिवाय वावडिंगाची त्वचेवर थोडीबहुत उत्तेजक क्रियाहि होत असते.

) फळांपासून तयार केलेले मलम नायटा इतर त्वचारोगांवर लावतात.

) हे फार मौल्यवान कृमिघ्न आहे. ह्या औषधाने कृमी मरून पडतात.

#वावडिंग_पर्यावरण_संवर्धन_समिती

***माहिती संकलन

@पर्यावरण संवर्धन समिती

९८९०३४१११०