Portia tree or Indian Tulip Tree/ Gulbhendi
Thespesia populnea, commonly known as the portia tree, Pacific rosewood, Indian tulip tree or Gulbhendi in Marathi, or milo, among other names, is a species of flowering plant belonging to the mallow family, Malvaceae.
Dhananjay Patil
8/4/20241 min read
गुळभेंडी
हे तपकिरी रंगाची खरखरीत साल असलेले मध्यम आकारचे व छत्रीसारख गोल वाढणारे वर्षभर हिरव्या, पिंपळासारख्या पानांनी आच्छादलेला वृक्ष आहे. याला पिवळ्या रंगाची मोठी, शोभेची फुले वर्षभर येतात. ही फुले जसजशी परिपक्व होतात तशी जांभळट, मातकट लाल रंगाची होतात. या फुलांच्या अंश:कोषात पाकळ्यांच्या मुळांशी गडद लाल मखमली रंग असतो. त्या झाडाची फळेही हिरवी गार टणकफळे, फळ फोडल्यावर त्यातून पिवळा रंग निघतो.
गुळभेंडी झाड हे विशेष म्हणजे कोणत्याही मातीत वाढू शकते शोभिवंत असल्यामुळे त्याची लागवड उद्यानात तसेच रस्त्याच्या कडेने केली जाते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे या झाडांची लागवड रस्त्याच्या दुतफ्रा आढळते. क्षारयुक्त जमिनीतही याची पैदास आणि वाढ जोमाने होते. बियांनी तसेच छाटणी पद्धतीने रोप तयार करून झाडांची पैदास करता येते. याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, बैलगाडीची चाके आणि होड्या, पडाव, खोकी, शेतीची अवजारे तयार करण्यासाठी होतो. कागद तयार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याच्या साली व फळांपासून लालसर दाट वंगणाचे तेल मिळत. फुलांपासून पिवळा रंग तयार करतात. एरंडयाच्या तेलातला भेंडीच्या बियांचा अर्क कीटकांच्या, प्रामुख्याने डासांच्या चावाण्यावर वर उपाय आहे.
औषधी उपयोग
१) गुळभेंडीचे मूळ शक्तीवर्धक आहेत.
२) त्वचा विकारांवर हे सर्वण्यात औषध आहे.
३) याचा उपयोग अतिसारत उपचारामध्ये केला जातो.
४) मधुमेहाच्या उपचारांमध्ये केला जातो.
#गुळभेंडी_पर्यावरण_संवर्धन_समिती
***माहिती संकलन
@पर्यावरण संवर्धन समिती ९८९०३४१११०

